महानगरपालिका निवडणूक 2025-26 : मतदान केंद्रांची संयुक्त पाहणी, सुरक्षित व पारदर्शक मतदानासाठी प्रशासन सज्ज

आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पारदर्शक, सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी आज शहरातील महत्त्वाच्या मतदान केंद्रांची संयुक्त पाहणी करण्यात आली.

अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक तयारीचा आढावा घेतला.

जमील कॉलनी परिसरातील शाळा क्र. 8 (मतदान केंद्र क्र. 19), ॲकॅडमी स्कूल, असोसिएशन स्कूल व विद्या निकेतन स्कूल येथे पाहणी करण्यात आली.

यावेळी सुरक्षा व्यवस्था, प्रशासकीय तयारी, प्रवेश-निर्गमन व्यवस्था, मतदारांच्या गर्दीचे नियोजन व मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला.

पोलिस आयुक्तांनी मतदान केंद्रांवर पुरेशा सुरक्षा पथकांची तैनाती, CCTV व इतर सुरक्षा साधनांची कार्यक्षमता तसेच गर्दी नियंत्रणासाठी योग्य नियोजनाचे निर्देश दिले.

आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्वच्छता, पाणी, प्रकाश, शौचालये, प्राथमिक वैद्यकीय सुविधा व मतदान साहित्याची संपूर्ण तयारी सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या.

प्रशासनाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मतदार यादी, मतदान साहित्य व सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आल्या असून, नागरिकांना सुरक्षित, सुलभ व विश्वासार्ह मतदानाचा अनुभव देण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत.

या पाहणीवेळी उपायुक्त, पोलीस अधिकारी, निवडणूक अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top