अमरावती महानगरपालिकेत जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती सोमवार, दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी साजरी करण्यात आली.

या निमित्ताने महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे त्यांच्या प्रतिमेस हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या हस्ते जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस हारार्पण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top