अमरावती महानगरपालिका आयुक्त मा. सौ. सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त मा. शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त (झोन क्र. २) श्री. भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक परिसरात प्लास्टिक जप्ती व दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली.
झोन क्र. २ (राजापेठ) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान एकूण २५ व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान काही ठिकाणी कापडी व कागदी पिशव्यांसोबतच ५१ मायक्रोनपेक्षा जाडीचे प्लास्टिक साहित्य वापरात असल्याचे निदर्शनास आले.
तसेच, २ आस्थापनांमध्ये डस्टबीनची सुविधा नसल्याचे आढळून आल्याने नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये:
1.श्री. नरेश कुकरेजा – ₹१,०००/-
2.श्री. सोनू ट्रेडर्स – ₹१,०००/-
असा एकूण ₹२,०००/- (रुपये दोन हजार) दंड वसूल करण्यात आला.
सदर मोहिमेत प्लास्टिक निर्मूलन नोडल अधिकारी श्री. विनोद टांक, स्वास्थ निरीक्षक श्री. धनिराम कलोसे, मनिष हडाले, शक्ती पिवाल व शैलेश डोंगरे सहभागी होते.


