अतिक्रमण व स्वच्छता विभागाची संयुक्त धडक कारवाई | ३ ट्रक साहित्य जप्त; मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू

शहरातील वाढती अतिक्रमणे व त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेता, अमरावती महानगरपालिका आयुक्त माननीय सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या स्पष्ट निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत अतिक्रमण विभाग व स्वच्छता विभागाच्या संयुक्त विद्यमाने विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.

आज सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत चित्रा चौक, इतवारा बाजार चौक, टांगा पडाव चौक ते गांधी चौक व राजकमल चौक या मुख्य मार्गांवरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हॉकर्सच्या हातगाड्या तसेच परकोटलगत कचरा टाकणाऱ्या हातगाड्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण विभागामार्फत ३ ट्रक भरून हातगाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. कारवाई सुरू होताच काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली.

शहरातील रस्ते व फूटपाथ पूर्णतः मोकळे होईपर्यंत ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अतिक्रमणधारकांनी स्वेच्छेने अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा महानगरपालिका प्रशासनाकडून ती हटविण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top