अमरावती महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी याकरिता शिक्षक सतत प्रयत्नशील असून महानगरपालिका उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 14 वडाळी येथे इयत्ता पहिली मध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांना नुकतेच शिक्षकांच्या सहकार्यातून स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आकर्षण व्हावे तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्साह वाढावा याकरिता शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्याकरिता स्कूल बॅग खरेदी करून ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतला आहे अशा नव प्रवेशित मुलांना स्कूल बॅग चे वाटप मुख्याध्यापक श्री योगेश पखाले व शिक्षक वृंदांच्या हस्ते करण्यात आले.
अमरावती महानगरपालिका शाळेमधील शिक्षक पटनोंदणी सर्वेक्षण घरोघरी जाऊन करीत असून परिसरातील कोणताही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये प्रत्येक विद्यार्थी या शाळेत प्रवेशित व्हावा याकरिता प्रयत्न सुरू असून अमरावती महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 14 वडाळी च्या मुख्याध्यापक व स्टाफ मिळून परिसरात सर्वेक्षण करत असून पात्र.
याकरिता शाळेतील शिक्षिका कुमारी नीलिमा लव्हाळे ,वैशाली देशमुख ,मनीषा वाकोडे, सुलोचना डाखोळे ,ज्योत्स्ना गवई,स्मिता वानखडे ,चेतना बोंडे, ज्योती सातपुते ,अनिता विधाते ,मोनिका पंधरे, निशा चव्हाण,अनुप भारंबे हे प्रयत्नशील आहेत.

