May 4, 2026

अमरावतीत जनगणना २०२७ साठी प्रशिक्षणाला गती; झोन सभापती स्वाती कुलकर्णी यांची भेट

आगामी २०२७ च्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका प्रशासनातर्फे सुरू असलेल्या गणक व पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आज प्रशिक्षणाचे तिसरे सत्र उत्साहात पार पडले. २३ एप्रिल ते ०८ मे २०२६ या कालावधीत शहरातील पाचही झोनमध्ये एकाचवेळी सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत विविध तांत्रिक व प्रात्यक्षिक सत्रांद्वारे गणक व पर्यवेक्षकांना सक्षम केले जात आहे. घरगुती […]

अमरावतीत जनगणना २०२७ साठी प्रशिक्षणाला गती; झोन सभापती स्वाती कुलकर्णी यांची भेट Read More »

महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनीची एमपीएससी द्वारे निवड

अमरावती महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्र. १४ वडाळी येथील विद्यार्थिनी कु. ऋतिका प्रदीप गायकवाड हिने सतत मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर एमपीएससी परीक्षा पास केली आहे. परीक्षा पास करून तिची निवड मंत्रालया मध्ये झालेली आहे. ऋतिका गायकवाड हिने महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. १४ येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. वडाळी शाळेचे

महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनीची एमपीएससी द्वारे निवड Read More »

अमरावतीत जनगणना मोहिमेला सुरुवात; मान्यवरांकडून ‘स्व-गणना’ करून नागरिकांना आवाहन

दि. १ मे — अमरावती शहरात आजपासून जनगणना मोहिमेला प्रारंभ झाला असून, यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभाताई खोडके, आमदार

अमरावतीत जनगणना मोहिमेला सुरुवात; मान्यवरांकडून ‘स्व-गणना’ करून नागरिकांना आवाहन Read More »

अमरावती महानगरपालिकेत महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा ६७ वा स्‍थापना दिवस साजरा

अमरावती महानगरपालिकेत महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा ६७ वा स्‍थापना दिवसानिमित्‍त महानगरपालिकेचे मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करुन साजरा करण्‍यात आला. शुक्रवार दिनांक १ मे,२०२६ रोजी अमरावती मनपाच्‍या प्रांगणात सदर ध्‍वजारोहन कार्यक्रम सकाळी ठिक ७.१५ मिनिटांनी घेण्‍यात आला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा ६७ वा स्‍थापना दिवसाच्या मंगलमय प्रसंगी, अमरावतीच्या जनतेला व उपस्थित

अमरावती महानगरपालिकेत महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा ६७ वा स्‍थापना दिवस साजरा Read More »

मनपात राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

गुरुवार दिनांक ३० एप्रिल,२०२६ रोजी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे शुभहस्‍ते राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेस हारार्पण विश्र्वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, झोन सभापती

मनपात राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी Read More »

माधुरी ठाकरे, स्‍वाती कुलकर्णी, ईस्‍माईल कासम लालुवाले, किशोर जाधव यांची झोन सभापतीपदी निवड

अमरावती महानगरपालिकेच्‍या पाचही झोन निहाय सभापतीची निवडणुक आज बुधवार दिनांक २९ एप्रिल,२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्‍व.सुदामकाका देशमुख सभागृह येथे आयोजित करण्‍यात आली होती. उत्‍तर झोन क्रमांक १ चे सभापतीपदी सौ.माधुरी सुहास ठाकरे, मध्‍य झोन क्रमांक २ चे सभापतीपदी सौ.स्‍वाती चंद्रशेखर कुलकर्णी, पुर्व झोन क्रमांक ३ चे सभापतीपदी ईस्‍माईल कासम लालुवाले, दक्षिण झोन क्रमांक ४

माधुरी ठाकरे, स्‍वाती कुलकर्णी, ईस्‍माईल कासम लालुवाले, किशोर जाधव यांची झोन सभापतीपदी निवड Read More »

आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “विशेष स्वच्छता मोहीम; मान्यवरांच्या श्रमदानातून छत्री तलाव परिसर स्वच्छ

आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका पूर्व झोन क्र. ३, दास्तूरनगर प्रभाग क्र. ९, SRPF वडाळी परिसरात मोठ्या प्रमाणावर “विशेष स्वच्छता मोहीम” राबविण्यात आली. या मोहिमेला मा.आमदार श्री. रविभाऊ राणा, मा. माजी खासदार सौ. नवनीतताई राणा, मार्गदर्शक मा. श्री. सुनिलभाऊ राणा तसेच मा. उपमहापौर श्री. सचिनभाऊ भेंडे

आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “विशेष स्वच्छता मोहीम; मान्यवरांच्या श्रमदानातून छत्री तलाव परिसर स्वच्छ Read More »

जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून संघटितपणे प्रयत्न करणार

मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होऊन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनसेवा सुरू झाली आहे. अशा स्थितीत जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व महापौरांवर अधिक जबाबदारी आहे. ही बाब लक्षात घेता, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून शासनाशी समन्वय साधण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्र महापौर

जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून संघटितपणे प्रयत्न करणार Read More »

मनपा शाळेत नव प्रवेशित विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

अमरावती महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी याकरिता शिक्षक सतत प्रयत्नशील असून महानगरपालिका उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 14 वडाळी येथे इयत्ता पहिली मध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांना नुकतेच शिक्षकांच्या सहकार्यातून स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आकर्षण व्हावे तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्साह वाढावा याकरिता शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्याकरिता स्कूल बॅग खरेदी करून ज्या

मनपा शाळेत नव प्रवेशित विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप Read More »

Scroll to Top