अमरावतीत जनगणना मोहिमेला सुरुवात; मान्यवरांकडून ‘स्व-गणना’ करून नागरिकांना आवाहन

दि. १ मे — अमरावती शहरात आजपासून जनगणना मोहिमेला प्रारंभ झाला असून, यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रविभाऊ राणा, उपमहापौर सचिन भेंडे तसेच स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी स्वतः स्व-गणना करून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यांनी नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढे येत स्व-गणना पूर्ण करावी व या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

जनगणना प्रक्रियेत अचूक व अद्ययावत माहिती नोंदविणे अत्यंत आवश्यक असून, डिजिटल माध्यमामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी, जलद व पारदर्शक होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी वेळेत स्व-गणना करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही मान्यवरांनी नमूद केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top