माधुरी ठाकरे, स्‍वाती कुलकर्णी, ईस्‍माईल कासम लालुवाले, किशोर जाधव यांची झोन सभापतीपदी निवड

अमरावती महानगरपालिकेच्‍या पाचही झोन निहाय सभापतीची निवडणुक आज बुधवार दिनांक २९ एप्रिल,२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्‍व.सुदामकाका देशमुख सभागृह येथे आयोजित करण्‍यात आली होती.

उत्‍तर झोन क्रमांक १ चे सभापतीपदी सौ.माधुरी सुहास ठाकरे, मध्‍य झोन क्रमांक २ चे सभापतीपदी सौ.स्‍वाती चंद्रशेखर कुलकर्णी, पुर्व झोन क्रमांक ३ चे सभापतीपदी ईस्‍माईल कासम लालुवाले, दक्षिण झोन क्रमांक ४ चे सभापतीपदी किशोर चंद्रशेखर जाधव यांची निवड करण्‍यात आली.

या निवडणुकीत पीठासिन अधिकारी तथा मा.जिल्‍हाधिकारी श्री. आशिष येरेकर यांनी काम पाहिले. पीठासिन अधिकारी श्री. आशिष येरेकर यांनी नवनियुक्‍त सभापती यांचे पुष्‍पगुच्‍छ देवुन अभिनंदन केले.

झोन क्रमांक १ सभापतीपदी सौ.माधुरी सुहास ठाकरे, झोन क्रमांक २ सभापतीपदी सौ.स्‍वाती चंद्रशेखर कुलकर्णी, झोन क्रमांक ३ सभापतीपदी ईस्‍माईल कासम लालुवाले, झोन क्रमांक ४ सभापतीपदी किशोर चंद्रशेखर जाधव यांची निवड झाल्‍याबद्दल मा.उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले, विधी समिती सभापती सौ.स्‍नेहा आशिष लुल्‍ला, उपसभापती डॉ.मधुरा मिलींद काहाळे, महिला व बाल कल्‍याण समिती सभापती सौ.ममता संदिप आवारे, उपसभापती सौ.लता रावसाहेब देशमुख, शहर सुधार समिती उपसभापती श्रीमती सुमती विजय ढोके तसेच सन्‍मा.नगरसेवक व नगरसेविका यांनी अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top