महानगरपालिका शाळेतील विद्यार्थिनीची एमपीएससी द्वारे निवड

अमरावती महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्र. १४ वडाळी येथील विद्यार्थिनी कु. ऋतिका प्रदीप गायकवाड हिने सतत मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर एमपीएससी परीक्षा पास केली आहे.

परीक्षा पास करून तिची निवड मंत्रालया मध्ये झालेली आहे. ऋतिका गायकवाड हिने महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. १४ येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेतले आहे.

वडाळी शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश पखाले केंद्रसमन्वयक श्री अनुप भारंबे व शाळेतील शिक्षकांनी नुकताच MPSC गट क मध्ये लेखा व कोषागार विभाग मध्ये निवड झाल्याबद्दल ऋतिका गायकवाड व तिच्या आई-वडिलांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच भविष्यासाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महानगरपालिका शाळांमधून शिकून अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर दिल्याचे आपल्याला दिसून येते यामध्ये शहरातील नामांकित डॉक्टर, नामांकित वकील, शहरातील नामांकित व्यावसायिक, लोकप्रतिनिधी हे सुद्धा महानगरपालिका शाळांमध्ये शिकून प्रगती करत असल्याचे चित्र आहे.

सत्कारवेळी शाळेतील शिक्षिका ज्योती सातपुते ,राजश्री सोळंके,
पूर्व प्राथमिक शिक्षिका करिष्मा गोफने या उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top