आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका पूर्व झोन क्र. ३, दास्तूरनगर प्रभाग क्र. ९, SRPF वडाळी परिसरात मोठ्या प्रमाणावर “विशेष स्वच्छता मोहीम” राबविण्यात आली.
या मोहिमेला मा.आमदार श्री. रविभाऊ राणा, मा. माजी खासदार सौ. नवनीतताई राणा, मार्गदर्शक मा. श्री. सुनिलभाऊ राणा तसेच मा. उपमहापौर श्री. सचिनभाऊ भेंडे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाला अधिक उत्साह आणि प्रेरणा मिळाली.
छत्री तलाव परिसरात आयोजित या मोहिमेत स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. परिसरातील रस्ते, मोकळी मैदाने आणि तलावाच्या काठावर साचलेला कचरा झाडू मारून साफ करण्यात आला.
वाढलेले गवत काढून परिसर नीटनेटका करण्यात आला. तलावातील साचलेला गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात आला. तसेच प्लास्टिक, पिशव्या, बाटल्या आणि इतर घनकचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित मान्यवरांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान केले. आमदार रविभाऊ राणा, माजी खासदार नवनीतताई राणा, मार्गदर्शक सुनिलभाऊ राणा आणि उपमहापौर सचिनभाऊ भेंडे यांनी प्रत्यक्ष स्वच्छता कामात सहभाग घेत नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कृतीमुळे “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.
या मोहिमेत सन्माननीय पदाधिकारी, गटनेते, नगरसेवक व नगरसेविका, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच मनपा स्थायी सफाई कामगार आणि कंत्राटी सफाई कामगार यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सर्वांनी एकत्रितपणे काम करत परिसर स्वच्छ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेकांनी स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी अशा मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमामुळे छत्री तलाव परिसर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक झाला असून पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागला आहे. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होऊन भविष्यातही परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रेरणा मिळाली आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या वतीने अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आमदार रविभाऊ राणा यांनी मनोगत करतांना सांगीतले की, स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. छत्री तलावासारख्या सार्वजनिक स्थळांची स्वच्छता राखणे ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आज आपण सर्वांनी एकत्र येऊन श्रमदान केले, हा केवळ प्रतीकात्मक उपक्रम नसून समाजाला जागरूक करण्याचा एक प्रयत्न आहे.
स्वच्छ परिसरामुळे आरोग्य सुधारते, पर्यावरण संतुलित राहते आणि शहराची प्रतिमा उंचावते. त्यामुळे प्रत्येकाने ‘माझा परिसर, माझी जबाबदारी’ ही भावना जोपासून स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
माजी खासदार नवनीतताई राणा यांनी मनोगत करतांना सांगीतले की, स्वच्छता ही आरोग्यदायी आणि सशक्त समाजाची पायाभूत गरज आहे. आपण स्वच्छतेबाबत जागरूक झालो, तर अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो आणि आपल्या पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण निर्माण करता येते. आजच्या विशेष स्वच्छता मोहिमेत सर्व स्तरांतील नागरिक, पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते आणि सामूहिक जबाबदारीची जाणीव दृढ होते. महिलांनीही पुढाकार घेऊन स्वच्छतेच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपण सर्वांनी मिळून ‘स्वच्छ अमरावती’चा संकल्प पूर्ण करूया.
उपमहापौर सचिनभाऊ भेंडे यांनी मनोगत करतांना सांगीतले की, अमरावती महानगरपालिका शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत आहे. मात्र, केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांनी हे शक्य नाही; त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. आजच्या विशेष स्वच्छता मोहिमेत सर्व स्तरांतील लोकांनी एकत्र येऊन काम केले, ही खूप सकारात्मक आणि प्रेरणादायी बाब आहे. तलाव परिसराची स्वच्छता करून आपण पर्यावरण संरक्षणालाही हातभार लावत आहोत. पुढील काळातही अशा मोहिमा अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यात येतील. नागरिकांनी कचरा टाकू नये, प्लास्टिकचा वापर कमी करावा आणि आपल्या परिसराची नियमित स्वच्छता राखावी. स्वच्छता ही सवय बनली, तरच आपले शहर खऱ्या अर्थाने सुंदर बनेल.
या मोहीमेत निळकंठराव कात्रे, जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, अजय गाडे, शिवदासजी घुले, सुखदेव तरडेजा, दादाराव महल्ले, गटनेते नाना आमले, शिक्षण समिती सभापती अॅड. प्रिती रेवणे, विधी समिती उपसभापती डॉ. मधुरा कहाळे, माजी महापौर संजय नरवने, नगरसेवक प्रा. प्रशांत वानखडे, अजय जयस्वाल, किशोर जाधव, महेश मुलचंदानी, योगेश विजयकर, दीपक साहू सम्राट, अँड.प्रशांत देशपाडे, संजय हिंगासपुरे, नगरसेविका रजनी डोंगरे, गौरी मेघवानी, अर्चना पांडे, प्रियंका पाटने, नंदा सावदे, सपना ठाकुर, किशोर पिवाल, नितीन बोरेकर, सोनाली नवले, अर्चना तालन, बाळु इंगोले, राजा बांगडे, उमेश ढोणे, किरण म.अंबाडकर, हर्षल रेवणे, संदिप कांबळे, तुषार दुधे, श्याम कथे, भुषण पाटने, इंजि.मिलींद कहाळे, अरुणा चचाणे, अशोक पांडे, बंडु डकरे, वंदना जामनेकर, शैलेश मेघवानी, शैलेश शिरभाते, सुचिता गोडे, अश्विनी झोड, अविनाश काळे, आशिष कावरे, राजु हरणे, श्रीकृष्ण बैलमारे, देवानंद राठोड, ओंकार माहोड, निरज गवई, नरेंद्र तलखेडे, संजय माहुलकर, संदिप कांबळे, मुस्ताकभाई, राजा बाखडे, स्वप्नील चाफले, रवि विरुळकर, देवा शेंडे, सुनिल तरडेजा, प्रशांत कावरे, अजय घुले, निता खडसे, अर्जुन दाते, यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, शहर अभियंता रविंद्र पवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, भुषण पुसतकर, मनोज शहाळे, पशुशल्य चिकीत्सक डॉ.सचिन बोंद्रे, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, अग्निशमन अधिक्षक अजय पंधरे, अतिक्रमण पथक प्रमुख श्याम चावरे, उपअभियंता प्रमोद इंगोले, दिनेश हंबर्डे, हेमंत महाजन, उद्यान निरीक्षक श्रीकांत गिरी, मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










