जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यात होणाऱ्या घर यादी व घरगणना प्रक्रियेसाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.
या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी डिजिटल स्व- गणनेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे या संधर्भात आयुक्त वर्षा लड्डा यांच्या मार्गदर्शनात महत्वपूर्ण परिप्रत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची गणना अनिवार्यपने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
या परिप्रत्रकानुसार 1 ते 15 मे या कालावधीत शासनाच्या अधिकृत पोट्रलावर डिजिटल पद्धतीने स्व – गणना करण्याची सुविधा उपलबध करून देण्यात आली आहे नागरिकांनी आणि विशेषतः कर्मचाऱ्यांनी शासनाच्या http//se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थालवार जाहून आपली माहिती नोंदवावी असे आव्हान प्रशासना मार्फत करण्यात आले आहे या प्रक्रियेत विचारण्यात आलेल्या 33 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन नागरिक स्वतःची माहिती ऑनलाईन भरू शकणार आहेत या आधुनिक पद्धतीमुळे माहिती भरण्याची अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्पष्ट केले आहे की, महानगरपालिका मुख्य कार्यालय, सर्व झोन कार्यालय, सर्व कार्यालय तसेच महानगरपालिकेत कार्यरत अस्थायी कर्मचारी यासर्वांनी ही स्व-गणना करणे आवश्यक आहे.
जनगणना ही केवळ एक शासकीय प्रक्रिया नसून ती देशाच्या भविष्यातील विकास आराखड्याचा पाया आहे. त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून ती यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी पत्राव्दारे केले आहे.
सर्व कार्यालय प्रमुख यांना त्यांच्या अखत्यारीतील कर्मचा-यांनी स्व-गणना पूर्ण केल्याची खातरजमा करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

4 thoughts on “15 मे पर्यंत स्व -गणना करावी: आयुक्त वर्षा लड्डा यांचे आदेश”
“Digital self-census is a very useful initiative by the government. It will make the census process faster, transparent, and easier for citizens. Everyone should actively participate in this important process.”
Good idea
Khup. Chan
I have given my name for degital census.Its nice attempt done Amravati municipal corporation.