दि. 13 मे 2026 रोजी सकाळी घराबाहेर पडलेल्या तुळजाबाई गवई या चालत-चालत प्रशांत नगर परिसरात पोहोचल्या होत्या. सायंकाळी शुभम कॉलनीजवळ त्या जखमी अवस्थेत आढळून आल्याची माहिती नागरिकांनी आधार केंद्राला दिली.
माहिती मिळताच आधार केंद्राच्या टीमने तातडीने घटनास्थळी पोहोचून विचारपूस केली. आजीबाई फक्त “संजय गांधी नगर” एवढीच माहिती देत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली.
अवघ्या तीन तासांत त्यांच्या कुटुंबाचा शोध घेण्यात यश आले. रात्री 10:30 वाजता तुळजाबाई गवई यांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.
या वेळी कुटुंबीयांनी अमरावती महानगरपालिका व आधार केंद्राच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले. नागरिकांनीही या तत्पर आणि संवेदनशील कार्याचे कौतुक केले.
या कार्यासाठी सुचिता कारमोरे, ज्योती राठोड, राजीव बसवनाथे व नितीन नांदूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
