स्रोतस्तरावरील कचरा विलगीकरणावर भर; RDF निर्मिती, बायोमायनिंग व वैज्ञानिक लँडफिल प्रक्रियेचा घेतला आढावा

शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे व अन्य मान्यवरांनी बुधवारी (दि. १३ मे) सुकळी येथील घनकचरा व्यवस्थापन (MSW) प्रकल्पाची पाहणी केली.

यावेळी शहरातून दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापन प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पाची २५० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया क्षमता असून, ओला, सुका, RDF आणि इनर्ट अशा स्वरूपात कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण व विलगीकरण केले जात असल्याची माहिती देण्यात आली.

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे व्यवस्थापन केले जात असून, ज्वलनशील कचऱ्यापासून तयार होणारे सुमारे १०० मेट्रिक टन RDF दररोज चंद्रपूर येथे पाठविले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मान्यवरांनी प्लांटमधील मशिनरी, कन्वेयर सिस्टीम, RDF निर्मिती प्रक्रिया, Animal Incineration Plant, वैज्ञानिक लँडफिल साईट तसेच बायोमायनिंग प्रकल्पाची पाहणी केली.

यावेळी “स्रोतस्तरावरील कचरा विलगीकरण” अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देत नागरिकांनी घरातूनच ओला व सुका कचरा वेगळा देण्याचे आवाहन करण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञान, पुनर्वापरक्षम व्यवस्थापन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांच्या माध्यमातून शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम व शाश्वत करण्यासाठी मनपा प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top