अमरावती महानगरपालिका मध्‍य झोन क्र. २ राजापेठ येथे झोन सभापती सौ. स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

अमरावती महानगरपालिका अंतर्गत मध्‍य झोन क्र. २, राजापेठ येथे आज सौ. स्वाती चंद्रशेखर कुलकर्णी यांनी झोन सभापती पदाचा पदभार स्वीकारला. यानिमित्त आयोजित समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवानी, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, झोन क्र.१ सभापती सौ. माधुरी ठाकरे, शहर सुधार समिती सभापती सौ. राधा कुरील, शिक्षण समिती सभापती सौ. प्रीती रेवणे, विधी समिती उपसभापती सौ. मधुरा काहाळे यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते सौ. स्वाती कुलकर्णी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विविध पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक संस्था व नागरिकांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.

पदभार स्वीकारल्यानंतर सौ. स्वाती कुलकर्णी यांनी राजापेठ परिसरातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले. स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, नालेसफाई, आरोग्य सुविधा तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिलांचे प्रश्न, युवकांसाठी उपक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यक्षमतेचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top