महानगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुलींचा उपमहापौरांकडून सत्कार

शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने मा. उपमहापौर श्री. सचिनभाऊ भेंडे यांच्या तर्फे सोमवारी उपमहापौर कक्षामध्ये वर्ग १० वीतील गुणवंत विद्यार्थिनींच्या वडिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

महानगरपालिकेमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या श्री. चंद्रकांत बुंदेले यांच्या दोनही मुलींनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.

कु. रिद्धी चंद्रकांत बुंदेले हिने ९२.२० टक्के गुण मिळवले असून कु. सिद्धी चंद्रकांत बुंदेले हिने ८७ टक्के गुण प्राप्त केले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल उपमहापौरांनी अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षण समिती सभापती अॅड. प्रीती रेवणे, गटनेते नानाभाऊ आमले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top