आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निवासस्थानापासून महानगरपालिका अमरावतीच्या प्रत्यक्ष घरगणनेचा शुभारंभ

अमरावती महानगरपालिकेच्या घरगणना अभियानाचा शुभारंभ आज दिनांक १६ मे २०२६ रोजी सकाळी ०८ वाजता मा. श्रीमती वर्षा लड्डा, आयुक्त, मनपा अमरावती यांच्या निवासस्थानास घरगणना क्रमांक प्रदान करून प्रत्यक्ष घरगणना कार्यास सुरुवात करण्यात आली.

यावेळी मा. श्रीमती वर्षा लड्डा, आयुक्त, मनपा अमरावती, मा. श्री योगेश पीठे, उपायुक्त (१), मनपा अमरावती, मा. श्री नंदकिशोर तिखीले, चार्ज अधिकारी झोन क्र. १, मा. श्री अक्षय निलंगे, सहाय्यक शहर जनगणना अधिकारी, श्री कैलास कुलट, श्री प्रफुल अनिलकर, श्री डेसमेंट फर्नांडिस प्रगणक तसेच श्रीमती राजकन्या डाबेराव पर्यवेक्षक उपस्थित होते.

यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी घरगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून नागरिकांनी प्रशासनाला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच घरगणना कार्य अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top