अमरावती महानगरपालिका उत्तर झोन क्र.१ रामपुरी कॅम्प अंतर्गत इतवारा बाजार परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या मोहिमेत २२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळल्याने पवन किराणा या आस्थापनावर ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
तसेच डस्टबिन नसल्याबाबत व्यंकटेश तेल भंडार, प्रविण साहू, जय बजरंग स्वीट मार्ट, राजू नमकीन, शिवाणी स्वीट मार्ट, पटेरिया स्वीट मार्ट आणि हेमराज साहू यांच्यावर प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. मोहिमेत एकूण १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डीक्याव, स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी, मेघराज ढेनवाल, निखिल खंगाळे, एम. सैय्यद, शाहू जवंजाळ, अनिकेत महल्ले आणि आशिष सहारे सहभागी झाले होते.
“स्वच्छ शहर – सुंदर शहर” अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी प्लास्टिकमुक्त परिसर निर्मितीस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

