गुरुवार दिनांक २१ मे,२०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेमध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसा निमित्य दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस हारार्पण करुन विनम्र अभिवादन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता करण्यात आले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, नगरसेवक बबलु शेखावत, मिलींद चिमोटे, नगरसेविका सुनिता भेले, ललिता रतावा, डॉ. अर्चना आत्राम, राजश्री जटाळे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, मनोज भेले, सुरेश रतावा, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
