स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळा उत्साहात संपन्न
अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी शहीद स्मारक कस्तुरबा उद्यान, नेहरू मैदान येथे पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यशाळेत सीड बॉलची संकल्पना, त्याची निर्मिती प्रक्रिया व पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी त्याचा उपयोग […]



