स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळा उत्साहात संपन्न

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी शहीद स्मारक कस्तुरबा उद्यान, नेहरू मैदान येथे पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेत सीड बॉलची संकल्पना, त्याची निर्मिती प्रक्रिया व पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी त्याचा उपयोग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी माती, शेणखत व विविध वनस्पतींच्या बियांचा वापर करून प्रत्यक्ष सीड बॉल तयार केले.

महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे सांगत युवकांनी मोठ्या प्रमाणात अशा उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. वाढते तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी व भविष्यातील पिढ्यांना निरोगी पर्यावरण देण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, मनोज शहाळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, डॉ. सचिन बोंद्रे आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत इंजि. हरिहर बोचरे (अध्यक्ष, वृक्ष संवर्धन फाऊंडेशन महाराष्ट्र), राजनंदिनी फाऊंडेशन, पर्यावरण मित्र श्री. मानेकर, श्रीमती रश्मी नावंदर तसेच निसर्गप्रेमी संतोष ठाकूर यांनी सहभाग घेत पर्यावरणीय कार्यात योगदान दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, उद्यान निरीक्षक श्रीकांत गिरी, महेश जोशी व उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top