शेगाव नाका ते रहाटगाव परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१० हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले (झोन क्र. १) यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव नाका ते रहाटगाव परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये महालक्ष्मी प्रोव्हिजन या आस्थापनामध्ये प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्याने संबंधित आस्थापनावर ₹५,००० दंडाची कारवाई करण्यात आली.

तसेच पाच आस्थापनांमध्ये आवश्यक डस्टबिन उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याने अश्वजीत पांडे, अंकुश मोहिते, पवन कोपे, शैलेश गावंडे आणि निलेश दगाड यांच्यावर प्रत्येकी ₹१,००० प्रमाणे दंड आकारण्यात आला. या कारवाईतून एकूण ₹१०,००० दंड वसूल करण्यात आला.

महानगरपालिकेच्या या विशेष मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डीक्याव, स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी, मेघराज ढेनवाल, निखिल खंगाळे, परिक्षीत गोरले, शाहू जवंजाळ, इमरान खान, रोहित हडाले, मनीष नकवाल आणि एम. सैय्यद यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top