उत्त्र झोन क्र.१ चे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशान्वये मालमत्ता कर थकबाकीदारांवर विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत असून, दिनांक १७ जून २०२६ रोजी दोन थकबाकीदार आस्थापनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
या अंतर्गत गोल्डन किड्स हायस्कूल यांच्याकडे मालमत्ता कराची रुपये ११,२३,८०८/- इतकी थकबाकी असल्याने जप्तीची नोटीस बजावण्यात आली. तसेच संबंधितांना सात दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
निर्धारित मुदतीत रक्कम जमा न केल्यास मालमत्ता जप्ती संदर्भात सिलिंगची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तसेच अग्रेशन पेट्रोल पंप यांच्याकडे मालमत्ता कराची रुपये ४,२२,५०६/- इतकी थकबाकी असल्याने त्यांनाही जप्तीची नोटीस बजावण्यात आली.
संबंधितांना सात दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरण्याचे निर्देश देण्यात आले असून, रक्कम न भरल्यास जप्ती संदर्भात सिलिंगची कारवाई करण्यात येईल, याबाबत अवगत करण्यात आले.
महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांनी तात्काळ कर भरणा करून कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन केले आहे.
