दस्तुरनगर परिसरात थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्ती नोटिसा

अमरावती महानगरपालिका पूर्व झोन क्र. ३ अंतर्गत दस्तुरनगर परिसरात मालमत्ता कराच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्ती नोटिसा बजावण्यात आल्या.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, वार्ड क्र. ८ मधील मालमत्ता क्रमांक ११४ चे धारक श्री. रविराज हिम्मतराव देशमुख यांचे पेट्रोल पंप, विद्यापीठ कॉलनी, एमआयडीसी रोड यांच्याकडे सुमारे ९ लाख रुपयांची थकबाकी असून त्यांना जप्ती नोटीस देण्यात आली.

तसेच मालमत्ता क्रमांक ९३८ चे धारक किचन ३६५चे महेश पहुमल छाबडा यांच्याकडेही ९ लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांनाही नोटीस बजावण्यात आली.

याशिवाय एमआयडीसी परिसरातील मालमत्ता क्रमांक २२५५-३ चे धारक जाधव ग्रुप यांच्याकडे ५ लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी असल्याने संबंधित मालमत्तेस जप्ती नोटीस देण्यात आली.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी शेखर सोनकांबळे, वसुली लिपीक दीपक सरसे, राज डेंडुले तसेच भागिरथ खैरकर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top