मसानगंज व तपोवन परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणी मोहीम; ₹१४,५०० दंड वसूल

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले झोन क्र.१ यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (२२ जून) मसानगंज, तपोवन परिसर आणि लगतच्या व्यापारी भागात प्रतिबंधित प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान एकूण २३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर तसेच डस्टबिन नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करताना आढळून आलेल्या संतराम साहू यांना ₹५,००० व राजेश पंचमलाल साहू यांना ₹५,००० असा दंड आकारण्‍यात आला. तसेच डस्टबिन नसल्याबाबत अंजली किराणा यांना ₹१,०००, जय गजानन धान्य भंडार यांना ₹१,०००, सारिका उज्जैनकर यांना ₹५००, गणराज पान सेंटर यांना ₹५००, संजीवनी गावंडे यांना ₹५०० आणि जितेंद्र पाटील यांना ₹१,००० दंड आकारण्यात आला.

या कारवाईत एकूण ₹१४,५०० इतका दंड वसूल करण्यात आला. महानगरपालिकेने नागरिक व व्यावसायिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top