अमरावती महानगरपालिकेत उपायुक्त या पदावर भाग्यश्री बोरेकर ह्या बुधवार दिनांक २४ जुन,२०२६ रोजी रुजु झाल्या. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची भेट घेवून त्यांनी उपायुक्त या पदाचा पदभार स्विकारला. त्या भातकुली नगर पंचायत येथे मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होत्या.
यापूर्वी भाग्यश्री बोरेकर यांनी अमरावती महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर काम केले आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपस्थित होते.
