अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य लेखापालपदी श्रीमती शिल्पा पवार रुजू

अमरावती महानगरपालिकेच्या मुख्य लेखापाल म्हणून श्रीमती शिल्पा पवार यांनी आज पदभार स्वीकारला. त्यांनी मुख्य लेखापरीक्षक श्री शामसुंदर देव यांच्याकडून पदभार घेतला.

यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती पवार यांच्या रुजू होण्याने महानगरपालिकेच्या आर्थिक व लेखा विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार असून महसूल व्यवस्थापन, लेखा नियोजन व आर्थिक शिस्त बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने श्रीमती शिल्पा पवार यांचे स्वागत करण्यात आले असून त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top