अमरावती मनपा पश्चिम झोन क्र. ५ च्या झोन सभापतीपदी खॉ आसिया अंजुम वहिद यांची निवड

अमरावती महानगरपालिकेच्या पश्चिम झोन क्र. ५ च्या झोन सभापतीपदासाठी गुरुवारी दि. २ जुलै,२०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात निवडणूक पार पडली.

या निवडणुकीत श्रीमती खॉ आसिया अंजुम वहिद यांची झोन सभापतीपदी निवड करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेस जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. निवड जाहीर झाल्यानंतर त्यांनी नवनिर्वाचित झोन सभापती खॉ आसिया अंजुम वहिद यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी गटनेते शेख हमीद शेख वाहेद, नगरसेवक अहेमद शाह इकबाल शाह, सलाहुद्दीन इकरामोद्दीन, डॉ.संजय शिरभाते, सैय्यद राशद अली सै. शौकत अली, मोहमद रेहान मोहमद यासीन, तसेच नगरसेविका सौ.सुनिता भेले, श्रीमती फरहा नाज सय्यद मीर अहद अली, श्रीमती कुबरा बानो करामत अली, श्रीमती शाह अफसर जहा सादिक, श्रीमती शाह बीबी बतुल ताहेर, डॉ.मरीयम बानो मोहम्‍मद ईस्‍माईल रारानी यांच्यासह उपस्थित नगरसेवक व नगरसेविकांनी नवनिर्वाचित झोन सभापतींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पीठे यांनी ही नवनिर्वाचित झोन सभापतींना शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top