July 5, 2026

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावतीत महिला बचत गटांचा आढावा

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. श्रीमती विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महिला बचत गटांच्या सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. बैठकीत महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा सविस्तर आढावा […]

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अमरावतीत महिला बचत गटांचा आढावा Read More »

श्रीकृष्ण मंदिरालगतच्या अनधिकृत अतिक्रमणावर महानगरपालिकेचा कारवाईचा इशारा; संयुक्त पाहणी करून मोजमाप व सीमांकनाचे निर्देश

मौजा जेवड येथील सर्व्हे क्रमांक २७/२ मधील श्रीकृष्ण मंदिरालगतच्या जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. यापूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना जागा रिकामी करण्याबाबत सूचना व निर्देश देण्यात आले होते. त्यानंतरही अतिक्रमण कायम असल्याने आज, गुरुवार (दि. २ जुलै २०२६) रोजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी संयुक्त पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाईला गती

श्रीकृष्ण मंदिरालगतच्या अनधिकृत अतिक्रमणावर महानगरपालिकेचा कारवाईचा इशारा; संयुक्त पाहणी करून मोजमाप व सीमांकनाचे निर्देश Read More »

शासन निर्णयानुसार निवासी अतिक्रमणे नियमानुकूल (पट्टा वाटप) प्रक्रियेबाबत नागरिकांना सूचना

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील पात्र निवासी अतिक्रमणे नियमानुकूल (पट्टा वाटप) करण्याची प्रक्रिया राज्यभर राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, गटनेता डॉ.राजेंद्र तायडे, गटनेता नाना आमले, गटनेता शेख

शासन निर्णयानुसार निवासी अतिक्रमणे नियमानुकूल (पट्टा वाटप) प्रक्रियेबाबत नागरिकांना सूचना Read More »

समन्‍वयाने काम करुन नागरिकांच्‍या समस्‍या तत्‍काळ सोडवा : महापौर श्रीचंद तेजवानी

अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची सविस्तर आढावा बैठक घेतली. शहरातील विविध विकासकामे, मूलभूत नागरी सुविधा, प्रलंबित कामे, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक आरोग्य, बांधकाम, उद्यान, विद्युत व्यवस्था तसेच इतर विभागांच्या कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा

समन्‍वयाने काम करुन नागरिकांच्‍या समस्‍या तत्‍काळ सोडवा : महापौर श्रीचंद तेजवानी Read More »

अमरावती मनपा पश्चिम झोन क्र. ५ च्या झोन सभापतीपदी खॉ आसिया अंजुम वहिद यांची निवड

अमरावती महानगरपालिकेच्या पश्चिम झोन क्र. ५ च्या झोन सभापतीपदासाठी गुरुवारी दि. २ जुलै,२०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात निवडणूक पार पडली. या निवडणुकीत श्रीमती खॉ आसिया अंजुम वहिद यांची झोन सभापतीपदी निवड करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेस जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. निवड जाहीर झाल्यानंतर त्यांनी नवनिर्वाचित झोन सभापती

अमरावती मनपा पश्चिम झोन क्र. ५ च्या झोन सभापतीपदी खॉ आसिया अंजुम वहिद यांची निवड Read More »

अमरावतीतील अतिगर्दीच्या इमारतींच्या अग्निसुरक्षेवर महत्त्वपूर्ण बैठक; १५ दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश

शहरातील अतिगर्दीच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये आणि नागरिकांच्या जीविताची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आज बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील विविध प्रकारच्या सार्वजनिक इमारतींमधील अग्निशमन सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान शहरातील

अमरावतीतील अतिगर्दीच्या इमारतींच्या अग्निसुरक्षेवर महत्त्वपूर्ण बैठक; १५ दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश Read More »

वसंतराव नाईक जयंती व दादासाहेब खापर्डे यांची पुण्‍यतिथी निमित्‍य हारार्पण कार्यक्रम संपन्‍न

बुधवार दिनांक १ जुलै,२०२६ रोजी वसंतराव नाईक यांच्‍या जयंती निमित्‍य वसंतराव नाईक यांच्‍या प्रतिमेस हारार्पण मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. तसेच दादासाहेब खापर्डे यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍य राजकमल चौकातील दादासाहेब खापर्डे यांच्‍या पुतळ्याला हारार्पण करण्‍यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त वर्षा लड्डा, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले,

वसंतराव नाईक जयंती व दादासाहेब खापर्डे यांची पुण्‍यतिथी निमित्‍य हारार्पण कार्यक्रम संपन्‍न Read More »

अमरावती महानगरपालिकेच्या शाळांचा पहिला दिवस उत्साहात; आयुक्तांसह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी, विद्यार्थ्यांना दिला शिक्षणाचा प्रेरणादायी संदेश

अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, मंगळवार दि. ३० जून २०२६ रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. शाळांमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मूलभूत सुविधा, अध्यापनाची तयारी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी शहरातील विविध महानगरपालिका शाळांना नियोजनबद्ध भेटी

अमरावती महानगरपालिकेच्या शाळांचा पहिला दिवस उत्साहात; आयुक्तांसह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी, विद्यार्थ्यांना दिला शिक्षणाचा प्रेरणादायी संदेश Read More »

प्लास्टिक बंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावतीत व्यापारी, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची जनजागृती कार्यशाळा

स्वच्छ, हरित, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक अमरावती शहर घडविण्याच्या उद्देशाने तसेच महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा, २००६ आणि राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलच्या अविघटनशील वस्तूंवरील वापरबंदीबाबत जारी केलेल्या अधिसूचनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अमरावती महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ३० जून) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहरातील व्यापारी, हॉटेल,

प्लास्टिक बंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अमरावतीत व्यापारी, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची जनजागृती कार्यशाळा Read More »

अमरावती जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघर्ष समितीकडून मा. महापौरांना निवेदन

अमरावती जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघर्ष समितीच्या वतीने अमरावती महानगरपालिकेकडून कोचिंग क्लासेसना देण्यात आलेल्या अग्निसुरक्षा (फायर सेफ्टी) नोटिसीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, यासाठी मा. महापौर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत शासनाने घालून दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करण्यास समिती सकारात्मक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, शहरातील

अमरावती जिल्हा खाजगी कोचिंग क्लासेस संघर्ष समितीकडून मा. महापौरांना निवेदन Read More »

Scroll to Top