अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. मंगेश गोंदावले रुजू

अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले (भा.प्र.से.) यांनी आज पदभार स्वीकारला.

माजी आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्याकडून त्यांनी अधिकृतरित्या कार्यभार स्वीकारत शहराच्या सर्वांगीण, शाश्वत व नागरिकाभिमुख विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. गोंदावले यांनी सांगितले की, अमरावती शहराच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून कार्य केले जाईल.

महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेले विविध विकास प्रकल्प, स्वच्छता, पायाभूत सुविधा, नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा आणि प्रशासनातील पारदर्शकता यांना सर्वोच्च प्राधान्य देत विकासकामांना अधिक गतिमान करण्यात येईल.

नागरिकांच्या अपेक्षांनुसार संवेदनशील, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी माजी आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी आपल्या कार्यकाळात अधिकारी व कर्मचारी वर्गाने दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

महानगरपालिकेची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी समन्वय, जबाबदारी आणि लोकाभिमुख दृष्टीकोन ठेवून कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच डॉ. मंगेश गोंदावले यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा देत अमरावतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांच्या कार्यकाळास यश लाभो, अशी सदिच्छा व्यक्त केली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top