अमरावती मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारताच महापौर श्रीचंद तेजवानी यांची घेतली सदिच्छा भेट

अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज, सोमवार दि. १३ जुलै,२०२६ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांची सदिच्छा भेट घेतली.

महापौरांच्या दालनात झालेल्या या भेटीत शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. नागरिकांना अधिक कार्यक्षम, पारदर्शक व दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महानगरपालिका आयुक्‍त डॉ. मंगेश गोंदावले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता नाना आमले, गटनेता डॉ.राजेंद्र तायडे यांनीही महानगरपालिका आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदावले यांचे पुष्‍पगुच्‍छ देऊन स्‍वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या.

महानगरपालिका आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदावले यांनीही शहराच्या विकासाला प्राधान्य देत नागरिकाभिमुख प्रशासनासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top