मा.आमदार रविभाऊ राणा यांच्याकडे वारंवार तेथील स्थानिक व्यापाऱ्यांचे निवेदन व इतर बाबींबाबत तक्रार प्राप्त असता. मा. आमदार रवीभाऊ राणा यांच्या निर्देशानुसार त्या पार्श्वभूमीवर आज अमरावती महानगरपालिकेचे सन्माननीय उपमहापौर सचिन भाऊ भेंडे तथा गटनेता नाना आमले यांनी मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत जे ऍन्ड डी मॉलला पाहणी दौरा आयोजित होता.
त्या भेटी अंतर्गत मॉलची पार्किंगमधील आणि मॉल मधील अत्यंत दुरावस्था पाहून खंत व्यक्त करण्यात आले. व्यापाऱ्यांचा प्रचंड रोष या सद्यस्थितीवर आणि महानगरपालिकेतर्फे निर्धारित केलेल्या बिल्डरवर आहे .
बिल्डरच्या सुद्धा बऱ्याच त्या निष्काळजीपणामुळे जे ऍन्ड डी मॉल च्या पार्किंग मध्ये आणि इतर ठिकाणी बरीच दुरावस्था आहे. करिता सदर आज पाहणे दौऱ्यामध्ये सर्व परिस्थिती पाहली असता.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय महेश देशमुख साहेब उपायुक्त नरेंद्र वानखडे साहेब कार्यकारी अभियंता कांबळे साहेब शहर अभियंता रवींद्र पवार अतिरिक्त अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे साहेब बाजार परवानाचे उदय चव्हाण साहेब व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते डॉक्टर जाधव साहेब दौऱ्यांमध्ये उपस्थित होते.
सदर मार्केटमध्ये बिल्डरमार्फत लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा मार्केट मनपा स्वतःकडे हस्तांतरित करून घेईल.


