गुरुवार दिनांक २३ जुलै,२०२६ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, नगरसेवक अॅड.प्रशांत देशपांडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
