मनस्विनी महिला फाऊंडेशनच्या ‘अभियान २०२६’चा शुभारंभ; महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते वृक्षारोपण

मनस्विनी महिला फाऊंडेशन, अमरावती यांच्या वतीने आयोजित ‘अभियान २०२६’ शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते झाले.

यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आयोजकांनी केलेल्या प्रेमळ सत्काराबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

त्यांनी सांगितले की, समाजहित आणि पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये सहभागी होणे हीच खरी लोकसेवा आहे.

कार्यक्रमादरम्यान मनस्विनी महिला फाऊंडेशनच्या सचिव सौ. रजनी आमले यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यात अधिकाधिक यश लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.

तसेच, पर्यावरण आणि समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मनस्विनी महिला फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे महापौरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास नगरसेविका राजश्री जटाळे, नूतन भुजाडे, तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष सोनीराम कडू, उपाध्यक्ष सौ. पाठक, सेवानिवृत्त भारतीय वनसेना अधिकारी सुभाषराव हिवलेकर, अंजीकार साहेब, दीपक आमले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top