अमरावती महानगरपालिका झोन क्र.२ राजापेठ अंतर्गत महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव तसेच सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही आस्थापनांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर तसेच स्वच्छता नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कारवाईअंतर्गत महालक्ष्मी दूध डेअरी आणि राधेय दूध डेअरी या दोन्ही आस्थापनांकडून प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आल्यामुळे प्रत्येकी ₹५०००/- असा दंड आकारण्यात आला.
तसेच राजेश बसंतवाणी यांच्याकडे आवश्यक डस्टबिन नसल्यामुळे ₹५००/- दंड आकारण्यात आला. या मोहिमेत एकूण ₹१०,५००/- इतकी दंड आकारणी करण्यात आली.
या विशेष मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ्य निरीक्षक धनिराम कलोसे, मिथुन उसरे, सचिन सैनी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
महानगरपालिकेने नागरिक व व्यापाऱ्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याचे, तसेच ओला व सुका कचरा वेगळा करून डस्टबिनचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
