अमरावती महानगरपालिका झोन क्र.३ अंतर्गत दस्तुरनगर परिसरात महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे झोन क्र.३ यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळी परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण १२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही आस्थापनांमध्ये महानगरपालिकेच्या स्वच्छता नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दोन डस्टबिन उपलब्ध नसल्यामुळे भावराव सहारे, विजय ठाकरे आणि प्रदीप भोयर यांच्याकडून प्रत्येकी ₹१०००/- प्रमाणे एकूण ₹३०००/- दंड आकारण्यात आला.
ही मोहीम प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी, मोहित जाधव, निलेश तंबोले, शैलेश डोंगरे यांच्या सहभागातून यशस्वीरित्या पार पडली.
महानगरपालिकेने सर्व व्यापारी व नागरिकांना स्वच्छता नियमांचे पालन करून दोन डस्टबिनचा वापर करावा तसेच सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर टाळून शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.