शेगाव नाका परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम; ८ हजार रुपयांचा दंड वसूल

रामपुरी कॅम्प झोन क्र. १ अंतर्गत शेगाव नाका परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान एकूण १८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी स्वच्छता नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

४ आस्थापनामध्ये डस्टबिन नसल्याबाबत आस्थापना नानक पंजवानी यांना ₹३,०००/-, सव्वालाखे ट्रेडर्स यांना ₹३,०००/-, प्रज्वल चांदेल यांना ₹१,०००/-, राहुल वाट यांना ₹१,०००/- दंड असे एकूण ₹८,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या विशेष मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू डीक्याव, स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी, निखिल खंगाळे, एम. सैय्यद, इमरान खान, आशिष सहारे आणि रोहित हडाले यांनी सहभाग घेतला.

महानगरपालिकेच्या वतीने नागरिक व व्यापाऱ्यांना प्लास्टिक वापर टाळण्याचे तसेच स्वच्छता नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top