स्व. प्रल्हादजी कोतवाल यांना महानगरपालिकेत भावपूर्ण श्रद्धांजली

अमरावती महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस तथा कर्मचारी चळवळीतील ज्येष्ठ नेते स्व. प्रल्हादजी कोतवाल यांच्या दुःखद निधनानिमित्त आज सायंकाळी अमरावती महानगरपालिका प्रांगणात भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, निवृत्त कर्मचारी तसेच हितचिंतकांनी स्व. कोतवाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. सभेच्या प्रारंभी दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्व. प्रल्हादजी कोतवाल यांनी कर्मचारी हितासाठी केलेल्या निःस्वार्थ कार्याचा गौरव केला.

त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असून त्यांचा साधेपणा, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कार्यपद्धती कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शेवटी दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभावी व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना करून श्रद्धांजली सभेचा समारोप करण्यात आला.

यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, झोन सभापती इस्‍माईल कासम लालुवाले, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, नगरसेवक आशिष अतकरे, सचिन वैद्य, सै. मुनज्जर अली, राजु कुरील, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, मुख्‍यलेखापरिक्षक श्‍यामसुंदर देव, मुख्‍यलेखाधिकारी शिल्‍पा पवार, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, मंगेश कडु, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे, सिस्‍टीम मॅनेजर अमित डेंगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा आत्राम, कार्यालय अधिक्षक गुलशन मिरानी, चंद्रकांत खानझोडे बी.एम.एस. व इतर सभासद बी.एम.एस.चे राजेंद्र दौड प्रदेश उपाध्‍यक्ष, योगेश पखाले शिक्षक संघटना, श्री.दंदे, श्री. जोशी, गणेश तंबोले, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, सुरक्षा रक्षक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top