शहरात अतिक्रमणांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथे अतिक्रमणे केली जातात. काही तर पक्के शेड ठोकून अतिक्रमणे करतात.
या अतिक्रमणांमुळेच शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आताही महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा या अतिक्रमणांना रडारवर घेतलं आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे.काही जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
मा. आयुक्त, महोदया यांच्या आदेशान्वये महानगरपालिकेच्यावतीने अतिक्रमण मोहिम सुरू असून आज दिनांक,05/08/2026 रोजी, सकाळी,11.30 वाजता पासून ते दुपारी,4.30 वाजेपर्यंत जेसीपीद्वारे गांधी चौक येथील गैरअर्जदार श्री. देशमुख, यांनी अनधिकृतपणे सार्वजनिक नालीवर चार पक्या स्वरूपाचे दुकाने बांधून अतिक्रमण केले होते, सदर अतिक्रमणामुळे लगतचे मार्केट परिसरामध्ये पावसाची पाणी साचून अडथळा निर्माण होत होता,सदर अतिक्रमण स्वतः काढून घेण्याबाबत संबंधित दुकानदारांना पूर्व सूचना नोटीस देण्यात आली होती, परंतु सदर अतिक्रमण त्यांच्याद्वारे न काढल्यामुळे झोन क्र,2 बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाद्वारे संयुक्तपणे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आली आहे जोपर्यंत शहरातील रस्ते व फूटपाथ मोकळे होणार नाही तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील.
ज्यांनी अतिक्रमण केलं असेल त्या सर्वांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका प्रशासन काढून घेईल. तसेच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल असा इशारा अतिक्रमण पथक प्रमुख यांनी दिल्या. या इशाऱ्याने अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ येथील अतिक्रमणांवर देखील लवकरच कारवाई करणार असून त्याबाबत शहरातील इतर भागातील अतिक्रमणे मोकळे करून शहरातील मुख्य रस्त्यावरील /फूटपाथ वरील अतिक्रमणांवर कारवाई करणार असे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त, यांनी सांगितले.
नागरिकांना या अतिक्रमणांचा त्रास सहन करावा लागत आहे. या गोष्टींचा विचार करुनच महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक कारवाई करून अतिक्रमणे काढून घेत आहे.
सदर कार्यवाहीमध्ये सहाय्यक आयुक्त,अविनाश रघटाटे, शाखा अभियंता, लक्ष्मण पावडे, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख,योगेश कोल्हे, स्वास्थ निरीक्षक, गावनेर,निरीक्षक, अन्सार अहमद,संदीप सोनवणे, व पोलीस कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचारी, उपस्थित होते.
