मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांची आधार केंद्राला सदिच्छा भेट

कौटुंबिक कलहामुळे घर सोडून आले, घरातून हाकलून दिलेले वृद्ध, म्हातारे, मतिमंद, अपंग, आंधळे, बहिरे, लंगडे, लुळे आणि भीक्षेकरी अशा गरजू लोकांसाठी मागील 15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आधार शहरी बेघर निवारा केंद्र, बडनेरा येथे आज अमरावती महानगरपालिकेचे नव्याने रुजू झालेले आयुक्त मा. डॉ. मंगेश गोंदवले यांनी सदिच्छा भेट दिली.

आधार केंद्र अमरावती महानगरपालिका आणि पब्लिक एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी च्या माध्यमातून चालवले जाते. या केंद्राला यापूर्वी सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त, खासदार, आमदार, विविध सामाजिक संस्था आणि महिलांचे बचत गट यांनी भेट देऊन कौतुक केले आहे.

आयुक्त डॉ. गोंदवले यांनी केंद्रातील प्रसन्न वातावरण आणि स्वच्छ परिसर पाहून समाधान व्यक्त केले. त्यांनी येथील प्रत्येक निवारावासींशी आस्थेने संवाद साधला, त्यांची विचारपूस केली आणि त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

व्यवस्थापक व संचालकांशी हितगुज करताना त्यांनी “आपल्याला आणखी काही आवश्यकता आहे का?” अशी आपुलकीने विचारणा केली आणि केंद्राच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त मा. महेश जी देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पीठे, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, श्री नंदकिशोर तीखिले, अभियंता श्रीरामजी तायडे, श्री तांबेकर, श्री भूषण बाळे श्री प्रफुल्ल ठाकरे व्यवस्थापक यांनी राष्ट्रीय उपजीविका अभियान विभाग मनपा अमरावती * हे प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच या प्रभागातील नगरसेवक श्री अजय जयस्वाल, सौ. रजनीताई डोंगरे झोन सभापती श्री.किशोर जाधव, सौ. गौरी मेघवानी आधार केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे, व्यवस्थापिका ज्योती राठोड, काळजीवाहक रोहित घोंगडे, विलास थोरात, किशोर मरकाम आणि 72 निवारावासी बंधू-भगिनी उपस्थित होते.

कौटुंबिक समस्यांमुळे रस्त्यावर आलेल्या निराधारांसाठी गेल्या 15 वर्षांपासून आधार देणाऱ्या या केंद्राला मनपा आयुक्तांच्या भेटीने नवा हुरूप मिळाला आहे. आयुक्तांच्या या भेटीमुळे निवारावासींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top