प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे रहाटगाव येथे सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी सकाळी महानगरपालिका आयुक्त श्री. मंगेश गोंदावले यांनी केली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी मौजे रहाटगाव सर्व्हे क्रमांक १२७ आणि मौजे रहाटगाव सर्व्हे क्रमांक ११६ येथील कामाचा सविस्तर आढावा घेतला.
दौऱ्यादरम्यान मा. आयुक्तांनी मौजे रहाटगाव सर्व्हे क्र. ११६ येथील प्रकल्पाला भेट देऊन लाभार्थ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आणि त्यांच्या अडचणींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून बांधकामाचा दर्जा, नागरी सुविधा आणि इतर सोयींविषयी चर्चा केली व त्यांच्या शंकांचे घटनास्थळीच निरसन केले.
मौजे रहाटगाव सर्व्हे क्र. १२७ येथील इमारतींचे शिल्लक असलेले बांधकाम व तांत्रिक बाबी उच्च दर्जा राखून तातडीने पूर्ण कराव्यात, जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर सदनिकांचा ताबा देता येईल, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिले.
तसेच मौजे रहाटगाव सर्व्हे क्र. १२७ येथील सदनिकेचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर पैसे भरावे या करिता आव्हान केले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान माननीय नगरसेवक श्री.विनोद तानवैस तसेच महानगरपालीकेचे अधिकारी कर्मचारी श्री. महेश देशमुख (अतिरिक्त आयुक्त), श्रीमती शिल्पा नाईक (अतिरिक्त आयुक्त), श्री. नरेंद्र वानखडे (उपायुक्त), श्री. श्रीधर कांबळे (शहर अभियंता), श्री. नितीन भटकर (उपअभियंता, प्र.आ.यो.), श्री. अविनाश अवसरे श्री. मंगेश कडु श्री. नंदकिशोर तिखिले श्री. हेमंत महाजन (उपअभियंता), श्री. विपिन त्रिवेदी (पालिका आर्थिक तज्ञ), जिशान शौकत अली शहा (पालिका अभियंता), उमर फारुक (स्था. अभियंता). श्री. अजिंक्य घोगरे (स्था. अभियंता), तसेच कंत्राटदार (विकासक) श्री. सोनल गुप्ता व श्री. नितीन पातुर्डे व प्रकल्पातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

