प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाईत ८७ किलो प्लास्टिक जप्त; १० हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

मंगळवारी, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी इतवारा बाजार रोड पेट्रोल पंप रोड परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ८७ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित आस्थापनांकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान परिसरातील एकूण सहा आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन आस्थापनांकडे प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले. यामध्ये दोन पोती (कट्टे) तसेच प्लास्टिक ग्लासची दोन मोठी कार्टून जप्त करण्यात आली.

पीयूष राठोड यांच्याकडून प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य आढळल्याप्रकरणी ५ हजार रुपयांचा दंड, तर अरुण भाऊ यांच्याकडून प्लास्टिक ग्लासची दोन मोठी कार्टून आढळल्याप्रकरणी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा प्रकारे एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईत प्लास्टिक बंदी नोडल अधिकारी ए. के. गोहर, प्लास्टिक बंदी स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी, स्वास्थ्य निरीक्षक मेघराज ढेंनवाल, अतिक्रमण विभाग प्रमुख कोल्हे, अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच बिटप्युन मयूर सारसर उपस्थित होते.

महानगरपालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराविरोधात तपासणी व कारवाईची मोहीम सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top