अमरावतीत ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘सात्त्विक गणपती’ या उपक्रमांतर्गत मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सांस्कृतिक भवन, अमरावती येथे ही कार्यशाळा होणार आहे.

‘सात्त्विक गणपती’ कु.मयुरी दिपक खताडे यांच्या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती महानगरपालिका तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे सहकार्य लाभणार आहे.

मा.जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या सहमती व मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

कार्यशाळेत नागरिकांना मातीपासून स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व, मातीच्या गणेशमूर्तींचे पर्यावरणीय फायदे आणि पर्यावरण संवर्धनाची गरज याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे ही कार्यशाळा नागरिकांसाठी पूर्णपणे मोफत असून, गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष शिकविण्यात येणार असल्याने नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा अनुभव मिळणार आहे.

पर्यावरणाचे रक्षण करत पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top