महानगरपालिका पूर्व झोन क्र. ३ अंतर्गत कॅम्प कॉर्नर ते यशोदा नगर रोडमार्गे अमर कॉलनी परिसरात सोमवारी अतिक्रमण विभाग व फ्रेजरपुरा पोलीस विभागाने धडक कारवाई केली.
या कारवाईदरम्यान रस्त्यालगत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या पानटपऱ्या, हातगाड्या, दुचाकी वाहने तसेच मोठे लोखंडी काउंटर हटविण्यात आले.
महानगरपालिका अतिक्रमण विभागाने केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले असून, जप्त केलेला माल दोन ट्रक भरून नेण्यात आला.
रस्ते व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या कारवाईदरम्यान महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि फ्रेझरपुरा पोलीस विभागाने संयुक्तपणे मोहीम राबविली.
कारवाईमुळे सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणाविरोधात महानगरपालिका प्रशासनाकडून पुढील काळातही कारवाई सुरू राहणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.
