श्याम चौक, मोची गल्लीत प्लास्टिकमुक्ती मोहीम; १२ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने श्याम चौक तसेच मोची गल्ली परिसरात स्वच्छता व प्लास्टिकमुक्त परिसर मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे तसेच झोन क्र. २ चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

मोहिमेदरम्यान प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, विक्री व साठवणूक यासह परिसरातील स्वच्छता आणि प्रत्येक आस्थापनामध्ये दोन डस्टबिनची उपलब्धता याबाबत तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दंडात्मक कारवाई :

– साहिल ट्रेडर्स — ₹५,०००: प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळल्याबद्दल.
– आशिष मेठानी — ₹५,०००: प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आढळल्याबद्दल.
– मंगेश गोंड — ₹१,०००: दोन डस्टबिनचा वापर आढळून न आल्याबद्दल.
– फिरोज खान — ₹१,०००: दोन डस्टबिनचा वापर आढळून न आल्याबद्दल.

या कारवाईतून एकूण ₹१२,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मोहिमेदरम्यान प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक श्रीकांत डवरे, तसेच स्वास्थ्य निरीक्षक सचिन सैनी, मिथुन वाघमारे, शक्ती पीवाल आणि पवन चावरे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील स्वच्छता राखण्यासोबतच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top