रुक्मणी नगरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात कारवाई; बिर्याणी सेंटरला ₹५ हजार दंड

अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात कारवाई सुरू आहे.

त्याअंतर्गत रुक्मणी नगर परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. पुरते यांच्या तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या प्लास्टिक पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देत संबंधित आस्थापनावर नियमानुसार कारवाई केली.

या कारवाईदरम्यान Donny Biryani House येथे प्रतिबंधित प्लास्टिक कंटेनर आढळून आल्याने संबंधितांकडून ₹५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

तसेच प्रतिबंधित प्लास्टिक कंटेनर जप्त करण्यात आले.

या कारवाईत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर आणि स्वच्छता निरीक्षक सचिन सैनी यांनी सहभाग घेतला.

शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top