आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सुकळी कंपोस्ट डेपो व शवदाहिनीची पाहणी — ‘स्वच्छ अमरावती’साठी कामे गतीमान करण्याचे निर्देश
दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सुकळी येथील कंपोस्ट डेपो तसेच मृत जनावरांसाठी प्रस्तावित शवदाहिनी प्रकल्प स्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी स्वच्छता, कचरा प्रक्रिया आणि कंपोस्ट निर्मितीची सद्यस्थिती तपासून संबंधित अधिकाऱ्यांना कामे गतीमान करण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी कंपोस्ट डेपोतील सेंद्रिय कचरा प्रक्रिया, वर्गीकरण यंत्रणा आणि स्वच्छता व्यवस्थेचा आढावा […]
