अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची आधार शहरी बेघर निवारा केंद्राला सदिच्छा भेट
मदर्स डेच्या निमित्ताने सामाजिक संवेदनशीलतेचा हृदयस्पर्शी अनुभव रविवारी आधार शहरी बेघर निवारा केंद्रात पाहायला मिळाला. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सहपरिवार केंद्राला सदिच्छा भेट देत निवारावासी बांधवांशी आत्मीयतेने संवाद साधला. आयुक्त वर्षा लड्डा यांनी केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून तेथील सुविधा, स्वच्छता, शिस्त तसेच निवारावासींसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी आधार केंद्राच्या […]
