आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची छत्री तलाव व प्रथमेश तलावाची पाहणी; सुविधा व सुरक्षेच्या दृष्टीने विभागांना दिले तातडीचे निर्देश
आगामी २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने तयारीला वेग दिला आहे. गणेश विसर्जनासाठी शहरातील प्रमुख विसर्जनस्थळांवर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक, प्रकाश व्यवस्था, अग्निशमन, सीसीटीव्ही, पार्किंग तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले
