आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील ई.व्ही.एम. गोदामाची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी
निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज सांस्कृतिक भवन परिसरातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) गोदामाची सखोल पाहणी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ई.व्ही.एम. यंत्रांची साठवणूक, सुरक्षा व व्यवस्थापनाची पडताळणी करण्यासाठी ही पाहणी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी ई.व्ही.एम. साठवणूक केंद्रातील कार्यपद्धती, नोंदणी प्रक्रिया, देखभाल व तांत्रिक तपासणीचा आढावा घेतला. गोदामातील सीसीटीव्ही व्यवस्था, प्रवेश […]

