मा. मुख्यमंत्री १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात अमरावती महानगरपालिकेला राज्यात पाचवा क्रमांक; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय यश
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मा. मुख्यमंत्री १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्या वतीने करण्यात आले. या मूल्यमापनाचे निकाल प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते जाहीर करण्यात आले. या मूल्यमापनात महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांमध्ये अमरावती महानगरपालिकेने २०० पैकी […]

